विकास हाच पक्षाच अजेंडा : प्रदेशाध्यक्ष नवसुपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

विकास हाच पक्षाच अजेंडा : प्रदेशाध्यक्ष नवसुपे

 विकास हाच पक्षाच अजेंडा : प्रदेशाध्यक्ष नवसुपे

शिव राष्ट्र सेनेची स्थापना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला व कृषी क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही जनतेच्या जनसंपर्कातून व समाजातील विविध घटकाचा विकास करण्यासाठी शिवराष्ट्र संघटनेची महाराष्ट्रात स्थापना करण्यात आली आहे. आज नगर शहरातून या पक्षाच्या वाटचालीस सुरुवात केली आहे. गेली 25-30 वर्षापासून शहरामध्ये विविध प्रश्न प्रलंबित असून, हे प्रश्न शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्यातून सोडविले जातील.
या पक्षाचे ध्येय सत्ता संपादन करणे व सत्तेत आलेल्या विविध राजकीय पक्षांचा खंबीर असा विरोधक म्हणून भूमिका वठवणे. तसेच महाराष्ट्रात राहणार्‍या तसेच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या विविध घटकांचा मग त्यात शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी महिला, व्यापारी यांच्या न्याय हक्क व स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरणारा पर्याय म्हणून शिवराष्ट्र सेना या पक्षाची स्थापना आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने करण्यात आली आहे. तसेच मराठी माणसाला महाराष्ट्रात व दिल्लीत केंद्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय मिळवून देणे हे पक्षाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पत्रकार परिषदे दरम्यान शिव राष्ट्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केले. याप्रसंगी शिव राष्ट्र सेनेचे राधाकिसन कुलट, भैरवनाथ खंडागळे, रत्ना नवसुपे, जालिंदर कुलट, बाळासाहेब जाधव व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवसुपे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी ग्रामीण व शहरी भागाचा सर्वांगिण स्तर उंचावण्यासाठी भौगोलिक व सांस्कृतिक या सर्व स्तराचा विचार हा शिवराष्ट्र सेनेच्या/पक्षाचा स्वप्नातील एक गाभा आहे. यात सर्व जाती व धर्मातील लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कात समानता जोपासणे यांचे एकीकरण करणे शिवराष्ट्र सेनेचा मूळ उद्देश आहे. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला व कृषी या सर्व प्रश्नांच्या आड येणार्‍या व तसेच या प्रश्नांची सोडवणूक करत असताना या विकासात्मक प्रश्नांच्या आड येणार्‍या विविध घटकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तसेच या सर्वांबरोबर संघर्ष करुन न्याय मिळविणे, यासाठी रचनात्मक गोष्टींची व कामांची उभारणी करणे हे शिव राष्ट्र संघटनेचे उद्देश आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने बर्‍याच वर्षांपासून जनतेला असाह्य वेदना देणारी आरोग्य, शेती, वीज, पाणी, रस्ते व्यापार, शिक्षण, पर्यटन, महिला कामगार, आदिवासी, विद्यार्थी, क्रीडा उद्योग, वित्त, गृह खाते, सहकार, रेल्वे कायदा सुव्यवस्था, केंद्र राज्य यात सर्व निर्माण होणार्‍या असंख्य जनेतच्या संयामाचा अंत पाहणार्‍या प्रश्नांची वेळीच संघर्षात्मक प्रश्नांची चर्चा व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन न्याय मागून प्रश्नांची सोडवणूक करणे हा मूळ उद्देश शिव राष्ट्र सेनेचा राहील.

No comments:

Post a Comment