कानडे मळा काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा : अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

कानडे मळा काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा : अविनाश घुले

 कानडे मळा काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा : अविनाश घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  प्रभाग 11 मधील कानडे मळा, कोंबडीवाला मळा काँक्रिटीकरण रस्त्याच्या निधीसाठी मनपाच्या बजेटमध्ये समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक अविनाश घुले यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात शेती आहे.
त्यामुळे वारंवार या रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे डांबरी रस्ता खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले आहे. त्याचबरोबर यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रभाग 11 मध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोरब नागरिकांना पाठीच्या मणक्याला त्रास सहन करावा लागत असून गाड्यांचेही नुकसान होत आहे. प्रभाग क्र. 11 मधील कोंबडीवाला मळा, कानडे मळा, महावितरण कार्यालयामागील परिसरात नागरिकांसह झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेची आम्ही पाहणी केली. या भागामध्ये शाळा, मंगल कार्यालये तसेच नागरिकांची मोठी वसाहत आहे. हा रस्ता काँक्रिटीकरणचा व्हावा, यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here