जननायक स्व. अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

जननायक स्व. अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना

 जननायक स्व. अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्व. अनिलभैय्या राठोड हे अहमदनगर शहरातल्या सर्वसामान्यांचा आवाज होते.  नगरकरांनी त्यांच्या वरती गेली पस्तीस वर्ष भरभरून प्रेम केले. अनिल भैय्या यांच्या स्मृती नगर शहरामध्ये कायम राहाव्यात, यासाठी जननायक स्व.अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती, मंचाचे संस्थापक निमंत्रक अनिकेत कराळे यांनी दिली आहे.
अनिकेत कराळे यांच्यासह ऋतुराज आमले, मनोज चव्हाण, तुषार लांडे यांचा मंचाच्या उभारणीमध्ये प्रमुख पुढाकार आहे.
याबाबत माहिती देताना कराळे म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्ष अनिलभैय्या या व्यक्तीमत्वावर मनापासून भरभरून प्रेम केले. मी स्वतः कधीही कोणत्याही पदावरती शिवसेनेमध्ये नव्हतो. परंतु अनिलभैय्या या व्यक्तिमत्त्वाशी माझे वैयक्तिक तसेच घरगुती स्वरूपाचे ऋणानुबंध होते.
अनिलभैय्या यांचे कार्य हे कायम मला आणि या शहरातल्या युवा पिढीला भारावून टाकणार होतं. विशेषत: त्यांच्यामध्ये असणारी प्रखर हिंदुत्वाची भावना ही या शहरातील तरुण पिढीला कायम आकर्षित करायची. दुर्दैवाने अनिलभैय्या यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. त्यामुळे माझ्यासारख्या त्याच्यावरती प्रेम करणार्‍या असंख्य युवा शिवसैनिकांमध्ये भैय्या आज हयात नाहीत याची मोठी सल आहे.
अनिलभैय्या हयात नसले तरी देखील त्यांचा विचार नगर शहरामध्ये कायम जिवंत राहावा यासाठी आम्ही त्यांच्या नावाने विचार मंचाची स्थापना केली आहे. या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांची जयंती, पुण्यतिथी, त्याचबरोबर त्यांना अभिप्रेत विविध सामाजिक उपक्रम आम्ही आयोजित करणार आहोत.
या विचार मंचाशी विनामूल्य सभासद होत जोडू इच्छिणार्‍यांनी आमच्या 7507555507 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निमंत्रक अनिकेत कराळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here