अहमदनगर दक्षिणमध्ये वंचितांची ताकद उभी करणार ः बारसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

अहमदनगर दक्षिणमध्ये वंचितांची ताकद उभी करणार ः बारसे

 अहमदनगर दक्षिणमध्ये वंचितांची ताकद उभी करणार ः बारसे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील प्रस्थापित सत्ताधार्‍यांच्या विरुद्ध राजकीय लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अहमदनगर दक्षिण जिल्ह्यामध्ये वंचित कार्यकर्त्यांची मोठी ताकद उभी करू अशी ग्वाही वंचीत बहुजन आघाडीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे दिली.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक माजी खा. ड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून 16 सप्टेंबर रोजी नगरचे कार्यकर्ते प्रतिक बारसे यांची वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर अहमदनगर दक्षिण जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पक्ष संघटन मजबूत करून, तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारण्यासाठी त्यांनी तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका व दौरे सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात नगर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुक्यात जाऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व बैठका घेतल्या.
कर्जत तालुक्यातील वंचित च्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या महारवतनाच्या जमिनीसाठीच्या आंदोलनाला भेट दिली. व कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यानंतर ड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत त्यांनी जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जामखेड नगरपरिषदेची निवडणूक लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. व त्यासाठी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मात्र प्रस्थापित सत्ताधार्‍यांविरुद्ध राजकीय लढाई लढायची असेल तर प्रत्येक तालुक्यात दलित, आदिवासी, बौद्ध, मुस्लिम, भटके विमुक्त व ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment