सुरक्षारक्षक हा सातत्याने आपली सुरक्षा करतो ः वाबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

सुरक्षारक्षक हा सातत्याने आपली सुरक्षा करतो ः वाबळे

 सुरक्षारक्षक हा सातत्याने आपली सुरक्षा करतो ः वाबळे

जिल्हा बँकेच्या सुरक्षा रक्षकांनी कर्डिलेंची भेट घेऊन दिले मागण्यांचे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाकाळ व इतर वेळेस  सुरक्षारक्षक नियमित काम करत आहेत  परंतू त्यांना शासकीय नियमाप्रमाणे साप्ताहिक सुट्टी आजपर्यंत मिळाली नाही  सुट्टी मिळणे हा त्यांचा हक्क आहे ,कारण पूर्ण महिना  काम असल्याने  तो आपली जबाबदारी चोख बजावतो  परीवाराला तो वेळ देऊ शकत नाही तो मिळाला पाहिजे, त्यामुळे त्यांना साप्ताहिक सुट्टी तसेच दिवाळी बोनस व विमा कवच मिळावे. सुरक्षा रक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. सुरक्षारक्षकाच्या जागरूक तेमुळे आपली मालमत्ता सुरक्षित राहते.सुरक्षारक्षक हा सातत्याने आपल्या सुरक्षा करतो.असे प्रतिपादन  नॅशनल एक्स सर्विस मॅन सेक्युरिटी गार्ड चे संचालक मनसुख वाबळे यांनी केले.
दीपावली बोनस, साप्ताहिक सुट्टी, व ए ड ख खर्पीीीरपलश मिळावा या मागणीचे निवेदन नॅशनल एक्स सर्विस मॅन सेक्युरिटी गार्ड चे संचालक मनसुख वाबळे व
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुरक्षा रक्षकांनी  माजी आमदार व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवाजी कर्डिले यांना दिले.
शिवाजी कर्डीले यांनी दीपावली बोनस, साप्ताहिक सुट्टी, व ए ड ख खर्पीीीरपलश मिळण्याकरिता सहकार्य करू व संचालक सभेत मान्यता घेऊ असे सांगितले.यावेळी सुरक्षारक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here