कै. सतिश जानवळे ः शिवस्मित मल्टीस्टेट बँकेचे मार्गदर्शक आधारस्तंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 24, 2020

कै. सतिश जानवळे ः शिवस्मित मल्टीस्टेट बँकेचे मार्गदर्शक आधारस्तंभ

 कै. सतिश जानवळे ः शिवस्मित मल्टीस्टेट बँकेचे मार्गदर्शक आधारस्तंभ


श्री सतीश मोतीराम जानवळे यांचा जन्म 1/11/1962 साली वार गुरुवार मातकुळी तालुका आष्टी जिल्हा बीड नावाच्या एका छोट्याशा गावात झाला. आई आणि वडील कामासाठी मातकुळी येथे गेले होते येथे जे मिळेल ते काम करून जीवनाचा उदरनिर्वाह करत होते आणि अशा संघर्षामध्ये दोन मुले आणि दोन मुली या दाम्पत्यांना झाले.

सतीश जानवळे हे सर्वात मोठे असल्यामुळे यांच्या खांद्यावरती कुटुंबाची जबाबदारी येऊ लागली आपल्या वडिलांना कामांमध्ये मदत करत त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली माध्यमिक शिक्षण घेत असताना मध्ये जे लहान-मोठे काम मिळेल ते केले. इयत्ता दहावी मध्ये असताना परिस्थिती सोबत संघर्ष करत शाळेत न जाता कामावरती जाऊन दहावीच्या परीक्षेचा यशस्वी प्रयत्न केला परंतु एक विषय जाऊन ते नापास झाले याच काळामध्ये शाळेतून आले की गिरणी चालवायचे काम करत होते आणि येथेच जीवनाचे आणि आयुष्याची जाणीव झाली आणि सर्व कुटुंब आई वडील भाऊ दोन बहिणी आपल्या वडिलांच्या या मूळ गावी म्हणजे काटवटवाडी ता.जि. बीड येथे आली दुसर्‍याच्या गावांमध्ये राहून प्रगती होत नाही याची जाणीव लवकर झाल्यामुळे पुढील आयुष्याची सुरुवात चांगली करता आली. मूळ गावी आल्यानंतर सर्वात प्रथम कपड्यांच्या दुकानांमध्ये हेल्पर म्हणून 150 रुपये प्रति महिना पगारावरती काम सुरू केले आणि या एकाच ठिकाणी 6  वर्ष काम केले आणि याच काळामध्ये यांची ओळख बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार केशर काकू शिरसागर यांच्यासोबत झाली आणि त्यांनी एका होतकरू विश्वासू इमानदार आणि कष्टाळू मुलाची पारख ओळखुन केसोना भारत गॅस एजन्सी मध्ये यायला सांगितले सतीश जाणवले यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत लगेच लगेच येऊन आयुष्याच्या एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात केली जून 1987 या या दिवशी केसोना भारत गॅस एजन्सी ची सुरुवात झाली आणि योध्याचा प्रवास सुरू झाला.

 भारत गॅस एजन्सी बीड मधील पहिली गॅस एजन्सी होती या काळामध्ये महिला वर्गाला आणि विशेष म्हणजे बीड सारख्या मागास जिल्ह्यामध्ये जनजागृती करून गॅस वाटप करावी लागली वाटप केलेल्या गॅस ग्राहकांना प्रत्येक लहान अडचणीवर ती घरी जाऊन समजून सांगावी लागेल तेही काम त्यांनी स्वतः केले.

10 मे 1989 साली त्यांचा विवाह यशवंतराव नवले गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या द्वितीय कन्या दैवशिला यांच्यासोबत झाला. त्या एका सदन घरांमधील होत्या तरी त्यांनी आपल्या नवर्‍याच्या स्वप्नासाठी खुप सार्या गोष्टींना तोंड देत सांभाळून घेत आलेल्या प्रत्येक प्रसंगावर मात करून हे सारे वैभव करण्यासाठी मोलाची साथ दिली. 27 मे 1991 रोजी या दाम्पत्यांना पुत्ररत्न झाले ,14 डिसेंबर 1993 रोजी एक कन्यारत्न झाले. कन्या येते घरी लक्ष्मी घेऊन या म्हणीप्रमाणे कन्यारत्न झाल्यानंतर सर्व परिस्थिती बदलत गेली आणि घरी सुखाचे वैभव नांदू लागले आयुष्याचा एक संघर्षमय प्रवास एका यशोगाथाकडे जाऊ लागला.

30 मे 2015 रोजी त्यांच्या लाडक्या कन्येचा शुभविवाह श्री शशिकांत पवार धालवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील गोकुळ पवार या तरुणासोबत झाला. मुलगी आणि जावई यांच्या कल्पक बुद्धीतून 9 नोव्हेंबर 2017 रोजी शिवस्मित  डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा शुभारंभ झाला ही कंपनी सुरू करत असताना सतीश जानवळे यांनी एक सासरा म्हणून नव्हे तर वडील म्हणून एक मार्गदर्शक आधारस्तंभ संचालक म्हणून विविध भूमिका निभावल्या.ही यशोगाथा सुरू असताना 10 ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वसामान्य जनता शेतकरीवर्ग गरजवंत त्यांच्या सेवेसाठी शिवस्मत मल्टीस्टेट बँक या बँकेची स्थापना झाली. बँक सुरू करून एका यशस्वी मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सतीश जाणवळे यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा आणि अनुभवाचा प्रत्यक्ष वापर केला आणि आपली मुलगी आणि जावई यांच्या यशोगाथेमध्ये एक सिंहाचा वाटा उचलला. ही यशोगाथा अशिच सुरू असताना 25 सप्टेंबर 2019 मध्ये शिवस्मित इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात झाली आणि या कंपनीचा सर्व कार्यभार पदभार यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा तिसरी यशोगाथा शिखरावरती नेण्याचा प्रयत्न केला. सतीश जानवळे यांच्या लाडक्या पुत्ररत्नाचा 24 मे 2020 रोजी विवाह संपन्न झाला आणि मुलगी जावई या सर्वांना एकत्रित करून मुलाच्या एका नव्या अध्यायासाठी सुरुवात केली  सर्व सुख समाधान मानसन्मान सुरु झाल्यानंतर सतीश जानवळे यांचे अवकाळी जाणे आम्हा सर्वांसाठी खूप मोठा धक्का आहे मामा तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण आमच्या घरी जन्म घेऊन आपली सेवा करण्याची आम्हा सर्वांना संधी देवो !

शोकाकुल 

गोकुळ शशिकांत पवार  

(संस्थापक अध्यक्ष, शिवस्मित मल्टीस्टेट बँक) 

प्रिया गोकुळ पवार (व्हा. चेअरमन, शिवस्मित मल्टीस्टेट बँक) 

विनोद सतीश जानवळे (संचालक, शिवस्मित मल्टीस्टेट बँक)

चेअरमन, संचालक, सर्व सभासद आणि कर्मचारीवृंद



No comments:

Post a Comment