मारुती सुझुकी विटारा ब्रेझाने अवघ्या 4.5 वर्षात 5.5 लाख गाड्यांच्या विक्रीसह आघाडीवर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

मारुती सुझुकी विटारा ब्रेझाने अवघ्या 4.5 वर्षात 5.5 लाख गाड्यांच्या विक्रीसह आघाडीवर

 मारुती सुझुकी विटारा ब्रेझाने अवघ्या 4.5 वर्षात 5.5 लाख गाड्यांच्या विक्रीसह आघाडीवर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  भारतातील अव्वल क्रमांकाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा अवघ्या 4.5 वर्षात 5.5 लाख गाड्यांच्या विक्रीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. कोणत्याही कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या तुलनेत ही सर्वाधिक वेगवान प्रगती आहे. 2016 च्या सुरुवातीला सादर झालेल्या विटारा ब्रेझाने या विभागत एरवी दुर्मिळ असणार्‍या ग्लॅमरस लुकमुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात एक नवी क्रांती घडवली. लुक्स, परफॉर्मन्स आणि गाडी चालवण्यातली सहजता असं सर्व काही एकत्र असल्याने या गाडीने अगदी लगेचच समीक्षक आणि ग्राहकांची मने जिंकली. अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ब्रँड विटारा ब्रेझाची रचना अगदी विचारपूर्वक, कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या अनोख्या जीवनपद्धतीला साजेशी अशीच करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या वेगाने बदलणार्‍या गरजांना त्याच पद्धतीने प्रतिसाद देत नव्या विटारा ब्रेझाला यंदाच्या 2020 ऑटो एक्सपोमध्ये नव्या स्वरुपात सादर करण्यात आले. आता ही गाडी दमदार आणि शक्तीशाली अशा 4 सिलेंडर 1.5 लि. के- सीरिज बीएस6  पेट्रोल इंजिनासह सज्ज आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळवणार्‍या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमुळे तुम्हाला ताकद, स्पोर्टीनेस आणि गाडी चालवण्याचा अतुलनीय अनुभव असा सुयोग्य मेळ मिळेल.
मारुती सझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) श्री. शशांक श्रीवास्तव या यशाबद्दल बोलताना म्हणाले, विटारा ब्रेझाने अगदी सुरुवातीपासूनच कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात आपले वर्चस्व राखले आहे. एक ट्रेंडसेटर म्हणून आपली ठळक आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि स्पोर्टी व्यक्तिमत्त्वामुळे ही गाडी सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आणि तिने विक्रीच्या आकड्यांमध्येही वर्चस्व राखले.
अनोखे डिझाइन आणि अप्रतिम रचना यामुळे ब्रेझाला या विभागातील इतर गाड्यांच्या तुलनेत वेगळेपण लाभले आणि त्यामुळे ती यशस्वी झाली. सगळ्यांसमोर दिमाखाने आणावे असे इंजिन, आकर्षक एसयूव्ही वैशिष्ट्ये, ड्युएल-टोनचे छत, आकर्षक नवे एलईडी हेडलँप आणि डीआरएल यामुळे गाडीच्या स्पोर्टी अंतर्गत रचनेला अधिक उठाव मिळाला. इतकेच नाही नेक्स्ट जनरेशन स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह हिल होल्ड असिस्ट वैशिष्ट्य अशा आधुनिक अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशन सुविधाही यात आहे. यातील ड्युएल बॅटरी प्रणाली विटारा ब्रेझाच्या अप्रतिम इंधनक्षमतेला चालना देते. यात अ‍ॅटोमॅटिक प्रकारात 18.76 किमी/लि आणि मॅन्युअल प्रकारात 17.03 किमी/लि. अशी इंधनक्षमता आहे. शिवाय यात आयडल स्टॉप-स्टार्ट आणि टॉर्क असिस्ट सुविधांसह रीजनरेटिव्ह ब्रेक एनर्जीही आहे. इतकेच नाही, यातील अंतर्गत प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वैशिष्ट्यांमुळे विटारा ब्रेझच्या नव्या स्वरुपाला कमालीचे यश लाभले आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला सादर झालेल्या विटारा ब्रेझाच्या आजवर 32000  हून अधिक गाड्या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत विकल्या गेल्या आहेत. आजवर डिझेल इंजिनच असणार्‍या विभागातील सर्वाधिक विक्रीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून या गाडीने स्थान मिळवले आहे आणि हे करतानाच एसयूव्हीमध्ये डिझेललाच प्राधान्य असते, या गैरसमजालाही दूर केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here