ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी स्मायलिंग अस्मिता खरा आधार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी स्मायलिंग अस्मिता खरा आधार

 ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी स्मायलिंग अस्मिता खरा आधार

आ. संग्राम जगताप ः छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे 12 वा. वर्धापनदिन साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचा 12 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाची खबरदारी पाळत कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व समाधीला पुष्पहार घालून झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरांमध्ये आलेले असतात. स्पर्धा जास्त असल्यामुळे घरूनही गुणांचे दडपण विद्यार्थ्यांवर असते. अशा विद्यार्थ्यांना घरातील व्यक्तीप्रमाणे जपणारी एकमेव निस्वार्थी विद्यार्थी संघटना म्हणजे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना होय. स्मायलिंग अस्मिताचे काम हे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले आहे. मुंबई पुणे व कोल्हापूर विद्यापीठांमध्ये स्मायलिंग अस्मिताने विद्यार्थ्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. यातील 30 पेक्षा अधिक विद्यार्थी हे लोकसेवा आयोगातून उच्चपदस्थ अधिकारी झाले तर काही मोठे उद्योजक झाले आहेत. ही अतिशय प्रेरणादायी बाब आहे. अहमदनगर शहरातील छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकाशझोतात आणण्याचे कामही स्मायलिंग अस्मिताने मनापासून केले आहे. आमदार म्हणून मी स्मायलिंग अस्मिताच्या सर्व कार्यात सहभागी असेल असा आशावाद आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त करत छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आधुनिकीकरणातबद्दल बोलताना म्हटले की जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक होईल अशा पद्धतीने चौथे शिवाजी महाराज स्मारकाचे आधुनिकीकरण करू असा शब्द यावेळी उपस्थितांना दिला. प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ. पारस कोठारी, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे राज्य सचिव मुन्नशेठ चमडीवाले, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, डॉ. अविनाश मोरे, प्रा. सदाशिवराव निर्मळे, काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्ष सविता मोरे तथा जिजाऊ ब्रिगेडच्या संपूर्णा सावंत उपस्थित होत्या.
नगरसेवक निखिल वारे म्हणाले की गेल्या सहा वर्षांपासून मी या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमांना उपस्थित असतो इतिहासाचे मागे पडलेले पैलू यांनी पुढे आणत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतिशय उत्तम जाळे तिन्ही विद्यापीठात स्मायलिंग अस्मिताने विणले आहे.महाविद्यालयीन निवडणुका असो किंवा राज्यातील इतर निवडणुका स्मायलिंग अस्मिताचे पक्षविरहित संघटन अशा वेळी ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी योग्य भूमिका घेते. ग्रामीण विद्यार्थ्यांची खरी अस्मिता म्हणून स्मायलिंग अस्मिताची ओळख आज निर्माण झाली आहे. डॉ. कोठारी म्हणाले की स्मायलिंग अस्मिताने कोरोनाच्याच्या काळात विद्यार्थ्यांसाठी मोठा लढा उभारत विद्यापीठने सरासरी गुण देत विद्यार्थ्यांसाठीच्या निर्णयात झालेल्या चुका उघड्या पाडत विद्यार्थ्यांना मोठा न्याय मिळून घेतला, शिवाय जनजागृतीपर शिवजयंतीच्या कार्यक्रमातून मोठे प्रबोधन स्मायलिंग अस्मिता गेल्या 12 वर्षांपासून करत आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी चळवळीतून पुढे येत मोठ्या फरकाने नगरसेवक होत अहमदनगर महानगरपालिकेचे नुकतेच स्थायी समितीचे सभापती झालेल्या मनोज कोतकर आणि कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज मोफत जेवणाची सुविधा देणार्‍या साईनाथ घोरपडे यांचा फ्रान्स येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्मायलिंगने सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी दरंदले यांनी केले तर आभार प्रदर्शन रिनुल नागवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आठवडाभरापासून सचिन सापते, अभिजीत शेटे, धिरज कुमटकर, संदेश शिंदे, संभाजी  कदम, ऋषिकेश दुसंग आणि कृष्णा कुंदूरकर यांनी मोठे परिश्रम घेतले होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here