घुले कारखान्यातर्फे ऊसतोडणीस सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

घुले कारखान्यातर्फे ऊसतोडणीस सुरुवात

 घुले कारखान्यातर्फे ऊसतोडणीस सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः नेवासे तालुक्यातील लोकनेते स्वर्गीय मारुतीरावजी घुले पाटील सहकारी साखर कारखाना भेंडा वतीने आजरोजी ढोरजळगाव गटातील माका, लिंबेनांदुर,वाघोलीसह गटातील उसतोडणीस सुरुवात कारखान्याचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी अधिकारी आहेर तसेच  गटातील गटवर्षर वांढेकर,पालवे यांच्या पहाणीनुसार चालू करण्यात आली.                                                                  याबाबत असे की,नेवासे तालुक्यात मुळा सह.सा.कारखाना तसेच घुले पाटील सह.सा.कारखाने लाभल्याने तालुक्यात जवळपास मुळाचे पाटपाणी असता,उसपीकाचे प्रमाण जास्तच असते.
या दोन्ही कारखानदारीमुळे संबधित शेतकरी वर्गास उसतोडणीस जाचक अडचणी येत नसल्याने,आज लिंबे नांदुर येथील शेतकरी अंबादास चेके,केशव चेके यांच्या उसपीक तोडणीस,माका येथील येथील वाहन मालक उसतोड कंत्राटदार देवीदास भुजबळ,खंडुभाऊ लोंढें,प्रकाश बुधवंत तसेच संबधित उसतोड कामगारांनी तोडणीस सुरुवात केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here