कर्जत-जामखेड मतदारसंघाने काय कमावले? ः प्रा. शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

कर्जत-जामखेड मतदारसंघाने काय कमावले? ः प्रा. शिंदे

 कर्जत-जामखेड मतदारसंघाने काय कमावले? ः प्रा. शिंदे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कोरोनाच्या काळात अंबालिका कारखान्याच्या परिसरात शासकीय कामे होऊ शकतात तर तालुक्यात का होत नाहीत, मतदार संघात नवे पर्व खोटेच सर्व असे सुरू असल्याची  टीका करत सध्या शासकीय कार्यालया थंगे बसले आहेत त्यामुळे जनता अधिकारी परेशान असून हे थंगे मात्र मजेत आहेत त्यामुळे या वर्षात मतदार संघाने काय कमावले? काय गमावले? असा प्रश्न माजीमंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी विधानसभेची वर्षपूर्ती होत असताना पत्रकार परिषद घेत उपस्थित केला.
24 ऑक्टो रोजी मागील वर्षी निकाल लागून मतदार संघाने नवे पर्व स्वीकारले मात्र या वर्षात कर्जत जामखेडकरांनी काय कमावले..! काय गमावले..! याचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे साहेब यांनी कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे यांनी सर्वाचे स्वागत केले यानंतर प्रा शिंदे यांनी वर्षभरात तालुक्याच्या खुंंटलेल्या विकासाचा लेखाजोखा मांडत राज्याच्या तिजोरीतून कर्जत-जामखेड मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणारी विकास गंगा आटली असल्याचे  स्पष्ट मत व्यक्त करताना, कर्जत तालुक्याची विकास कामे रोखली गेली असल्याचे सांगताना तुकाई सिंचन सारख्या योजनेच काम आतापर्यंत पुर्ण होऊन शेतकर्‍यांना त्याचा मोठा लाभ झाला असता ते काम बंद पाडल्याचे दाखवून दिले. कोंभळी फाटा ते भिगवण रोडचे हॅब्रीट अँँन्युटी योजनेतील काम वेळोवेळी थांबवत संथ गतीने होत असून त्यामुळे प्रवासी व नागरीकांचे अतोनात हाल होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात केंद्र शासनाकडून व भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली परंतू राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची भरीव मदत केली नसल्याचे सांगत, आपल्या काळात मंजूर केलेली कर्जत तालुक्यातील 25-15 हेडची मंजूर कामे रद्द करण्यात आली.
राशीन-पारिटवाडी-करपडी-मोहितेवस्ती या रस्त्याचे काम, खेड-आगवणवस्ती येथील रस्त्याचे काम, राशीन ग्रामपंचायत फिल्टर पाणी पुरवठा योजनेचे काम हे माझ्या काळात मंजूर करुन त्या सर्वाचे भुमिपुजन ही झाले होते त्याच कामाचे पुन्हा भुमिपुजन करणे शिष्टाचारात बसते का? पण जुन्या कामाची भूमिपूजने करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जत तालुक्यातील युवकांना नोकरीला लावतो असे मोठे अमिष दाखवून युवकांचा मेळावा घेऊन युवकांची दिशाभूल केली परंतु किती युवकांना नोकरीला लावले? महिला बचत गटाच्या नावाखाली फक्त पक्षाचे संघटन करण्याचे काम चालू आहे. परंतु महिला बचत गटांना कोणत्याही प्रकारचे लाभ देण्यात आलेले नाहीत. आमच्या कार्यकाळात नगरपंचायतीला विकास कामासाठी दिलेला निधी इतरत्र वळवला गेला. कर्जत तालुक्यात एम.आय.डी.सी. क्रिडा संकुल आणि एस. टी. डेपो एक महिन्यात करतो असे म्हणाले होते त्याचे काय झाले? मिरजगाव येथील उकरी नदी ते रिलायन्स पेट्रोल पंप या 100 मिटरचे 45 लाखाचे काम हे 15 दिवसातच उखडले, सदर काम पक्षाच्या नेत्याच्या भावाने केले म्हणून त्यास पाठीशी घातले जात आहे. चांगले काम न करणार्‍यां ठेकेदारांना काळ्या यादी टाकु ही घोषणा कधी पूर्ण होणार, मागील काळात कामे करणार्‍या त्याच ठेकेदारांना पुन्हा कामे दिल्याने पूर्वीची कामे ही चांगलीच झाली होती हे सिद्द् होत आहे,  माळढोक व इको सेनसीटीव्ह झोनचा प्रश्न आपण प्राधान्याने सोडवला. जलयुक्त शिवार योजनेतून कर्जत-जामखेड मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतीक्षेत्राला सुबत्ता आल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here