खेड येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा नागरी सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

खेड येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा नागरी सत्कार

 खेड येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा नागरी सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः लोकांचे प्रश्न सोडवत असताना आजपर्यंत कोणत्याही गटा-तटाचा कधीही विचार केला नाही. तळागाळातील लोकांची कामे व्हावीत यासाठी शासकीय कार्यालयातील कामे असो अथवा कोणतीही कामे असो आम्ही कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आहोत. सर्वांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.हा नागरी सन्मान आम्हाला ऊर्जा देणारा आहे. पुढील काळातही जनतेच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे मत नवनिर्वाचित काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.
खेड (ता.कर्जत) येथे ग्रामस्थांच्या वतीने खेड सेवा सोसायटीच्या सभागृहात ’नागरी सत्काराचे’ आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब मोरे हे होते.
यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत नव्याने निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविण घुले, जिल्हा सरचिटणीसपदी शंकर देशमुख तर तालुकाध्यक्षपदी किरण पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सर्वानुमते सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसभापती हेमंत मोरे, माजी पं.स. सदस्य आण्णासाहेब मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब मोरे, खेड सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत साळुंके,  सोमनाथ वाघमारे, उपसरपंच सचिन मोरे, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब मोरे, धनंजय खंडागळे, विठ्ठल वाघमारे, सचिन मोरे, लखन कांबळे, पोलीस पाटील उदयसिंह मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोरख मोरे, महादेव मोरे, संजीवन मोरे, संतोष निंबाळकर, अमित नलगे, सुनिल नलगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ वाघमारे, प्रास्ताविक आण्णासाहेब मोरे तर आभार उदयसिंह मोरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here