जामखेडमधील 3 दुकाने चोरट्यांनी फोडली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

जामखेडमधील 3 दुकाने चोरट्यांनी फोडली

 जामखेडमधील 3 दुकाने चोरट्यांनी फोडली

दोन संशयित ताब्यात

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः दोन दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बीड रोडवरील कोठारी कॉम्प्लेक्स या ठीकाणी तीन दुकाने फोडून अज्ञात चोरटयांनी चाळीस हजार रुपयांचे मोबाईल सह इतर सामान चोरुन नेले आहे. सलग दुसर्‍या दिवशी चोरीच्या घटना घडल्या आसल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी अरुण तात्या लटके रा. सातेफळ यांचे शहरातील कोठारी कॉम्प्लेक्स या ठीकाणी करायचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. ते मंगळवारी रात्री आपले दुकान बंद करून गावी गेले होते. बुधवार दि 21 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी या कॉम्प्लेक्स मधिल फीर्यादी चे मोबाईल शॉपीचे दुकान फोडून दुकानातील मोबाईल तसेच बाजुला आसलेल्या शु मार्ट चे सामान व किराणा दुकानातील कीराणा सामान असा एकुण 25 हजार पाचशे रुपयांचा एवज चोरुन नेला. एक दिवस आगोदर शहरातील सदाफुले वस्ती येथे देखील घरफोडी करून चोरटयांनी पावणेदोन लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरटयांनी चोरून होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सलग दुसर्‍या दिवशी बीड रोडवरील तीन दुकाने चोरटयांनी फोडली त्या मुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पोलीस तपास करीत असताना सी सी टी व्ही पुटेज मध्ये दोघे जण दिसुन आले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी दोन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोना फुलमाळी हे करत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here