जि.प.प्राथमिक शाळेत चोरी, आरोपीस अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

जि.प.प्राथमिक शाळेत चोरी, आरोपीस अटक

जि.प.प्राथमिक शाळेत चोरी, आरोपीस अटक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू येथे दि. 20 रोजी पहाटे शाळेचे दरवाजाचे कुलूप तोडून खिडक्या फोटो एलईडी कम्प्युटर शालेय साहित्य चोरी गेली मालमत्ता चे 65000 रूपयेची चोरी झाली. कर्जत जामखेड चे नवनिर्वाचित पोलीस उपधीक्षक आप्पासाहेब जाधव यांच्या आदेशाने जामखेड पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना आदेश देऊन आरोपीला तात्काळ अटक करा. यामुळे जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील  यांनी योग्य तो तपास दि.21  रोजी यावेळी 24 तासात आरोपीचा शोध लावण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. मनोज साखरे  यांनी आरोपाची माहिती मिळाताच  तात्काळ आरोपीला अटक केली आहे. खर्डा गावातील इसम शनि राजू डाडर वय 23 यास ताब्यात घेऊन, त्याचे कडेस बारकाईने विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार  आण्णा दिलीप गायकवाड याच्या सह गुन्हा केल्याची कबुली दिऊन गुन्हयात चोरलेला एलडी काढुन दिले ते पोलीसांनी जप्त केले आहे. आरोपी आण्णा  गायकवाड हा फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत आरोपी आण्णा गायकवाड हा कोणाला आढळून आला तरी जामखेड पोलीस स्टेशनला कळवा त्याच नाव गुप्त ठेवले जाईल अशी माहिती जामखेड पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील  यांनी दिली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here