गुंडेगाव येथे वन्य जीव वाचवण्यासाठी प्रयत्न....झुंज अपयशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 24, 2020

गुंडेगाव येथे वन्य जीव वाचवण्यासाठी प्रयत्न....झुंज अपयशी

 गुंडेगाव येथे वन्य जीव वाचवण्यासाठी प्रयत्न..झुंज अपयशी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

गुंडेगाव ः गुंडेगाव येथे २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास  गुंडेगाव नगर रोड वर चारचाकी वाहनद्वारे अज्ञात व्यक्तीकडून उडवण्यात आले होते, व ससा रस्ताच्या कडेला तडफडत होता, हे समजताच प्राणी मित्र संजय भापकर घटना स्थळावर पोहचले व लगेच वन अधिकारी मनसिंग इंगळे यांच्याशी संपर्क साधला व गुंडेगाव येथील वन कर्मचारी दाखल झाले, उपचार करण्यासाठी खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टर बोलवण्यात आले होते पण तोपर्यंत ससा चा दुर्दैवी मुत्य झाला होता, आज रोजी या वन्यजीव प्राण्यांवर शासकीय  वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल गडाख मार्फत पी.एम करून वन विभागाला अहवाल सदर केला आसे वनपाल अनिल गावडे यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले .   त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

       यावेळी पत्रकार संजय भापकर,  इतिहास प्रेमी दादा साहेब आगळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली कुताळ, डॉ. विलास सकट, वन कर्मचारी रमेश  शेळके,  कचरू भापकर, भोसले उपस्थित होते. जिल्हा उपवनसंरक्षक सुनील पाटील यांनी आहवान केले आहे की रात्री च्या वेळेस रस्तावरून वन्य प्राणी वाटचाल करीत आसेल तर वाहने सावकाश चालवावी असे मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment