‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’निमित्त कोविड टेस्ट कॅम्प नागेश विद्यालयात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’निमित्त कोविड टेस्ट कॅम्प नागेश विद्यालयात संपन्न

 ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’निमित्त कोविड टेस्ट कॅम्प नागेश विद्यालयात संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड  परिसरातील दर  नागेश विद्यालय रोड,मिलिंद नगर, तपनेश्वर गल्ली,कुंभार तळे , संतोषीमाता नगर, बीड रोड व विद्यालयाच्या आजुबाजुचा सर्व परिसरातील लोकांसाठी र्लेींळव-19 टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र नान्नज चे आरोग्य सहाय्यक श्री संपत गर्जे, श्रीमती विद्या कस्तुरे ,डॉ राहूल राख, डॉ.प्रशांत पाखरे, आशाताई-सारिका कांबळे ,शिल्पा पाखरे, माधुरी बेलदार, स्वाती परदेशी आरोग्यसेविका सुनिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आयोजन करण्यात आले. सुरुवातीस प्रथम नागेश विद्यालयाच्या वतीने आरोग्य पथकांचे सत्कार करण्यात आला यावेळी स्कूल कमिटीचे विठ्ठल आण्णा राऊत, प्राचार्य हरिभाऊ ढवळे ,रमेश बोलभट ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले पत्रकार पप्पू भाई सय्यद अजय अवचरे हे उपस्थित होते. नागेश विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ ढवळे यांच्यापासून कोव्हिड 19 ची  टेस्ट करून कॅम्प  उद्घाटन करण्यात आले. व नंतर रयत सेवक व विद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी टेस्ट करण्यास सुरुवात केली. लोकांचा उत्साह चांगला होता. डॉ. राहुल राख यांनी कुटुंबाची जबाबदारी घेऊन सर्वांनी स्वतःचे टेस्ट करून घ्यावी या मुळे कोरुना संसर्ग कमी होईल असे मनोगत केली. आरोग्य सहाय्यक  संपत गर्जे यांनी नागेश विद्यालय व सर्व टीमने  उत्कृष्ट सहकार्य केले व त्यांचे अभिनंदन केले.
     श्री. विठ्ठल अण्णा राऊत त्यांनी सर्व ग्रामस्थांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले व माझे कुटुंब माझी जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पडण्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here