कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, महाविद्यालयास सॅनिटायझर व मास्कचे कीट भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, महाविद्यालयास सॅनिटायझर व मास्कचे कीट भेट

 कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, महाविद्यालयास सॅनिटायझर व मास्कचे कीट भेट

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे अंतिम वर्ष परीक्षा व बॅकलॉग परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. या काळात स्वत: बरोबरच सर्व महाविद्यालयीन बांधवाची सुरक्षा महत्वपूर्ण असल्याने मी हे सुरक्षा कीट महाविद्यालयास भेट दिले.
          - श्रवण जंजाळ, तृत्तीय वर्ष कला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः जनता कला व विज्ञान महाविद्यालयात तृत्तीय वर्षात शिक्षत असलेल्या श्रवण किरण जंजाळ या विद्यार्थ्यांने कोरोनाच्या पाश्वभूमीवर विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या सुरक्षेच्यादृष्टिने महाविद्यालयास पन्नास सेनिटाझर चे स्प्रे, मास्क आणि सेनेटायझेरचे पाच लिटरचे कैन भेट देऊन विद्यार्थी दशेतच सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर, उपप्राचार्य डॉ डी एस तळुले, क्रीडासंचालक प्रा दादासाहेब वाळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा राजेंद्र गोरे , पी के  गोरे आदी उपस्थित होते .
विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर यांनी कौतुक केले. व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समाजाविषयी असलेली जाणीव शहरी भागातील विद्यार्थ्यांना ही अंजन घालणारी ठरेल असे प्रशंसोद्गार व्यक्त केले.
वास्तविक अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेकडुन रुईछत्तीसीच्या  जनता कला व विज्ञान महाविद्यालयाच्या  बॅकलॉगच्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिमुळे क्लासरूम निर्जंतुकरण करून सज्ज करण्यात आले आहेत. तरीही विद्यार्थ्याकडुन मिळालेली मदत ही अमुल्य आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर यांनी दिली. 

No comments:

Post a Comment