बळीराजा हतबल; ओला दुष्काळ जाहीर करा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

बळीराजा हतबल; ओला दुष्काळ जाहीर करा!

पाथर्डी भाजपा कार्यकर्त्यांनी अडविला पालकमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयची निदर्शने...

बळीराजा हतबल; ओला दुष्काळ जाहीर करा!


अहमदनगर ः अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. काही ठिकाणी रस्ते खचली आहे. तर शेतातील पिके अतिरिक्त पावसामुळे वाहून गेली व खराब झाली आहेत. सोयाबीन सारखे पिक शेताच्या बांधावर काढून ठेवले असताना पुराच्या पाण्याने वाहून गेली. कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांना ओला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पुराचे पाणी शेतात आल्याने संपुर्ण शेत पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी बंधारे देखील वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणी झाली आहे. सोयाबीन सोबतच मूग, उडीद पीक बर्यापैकी आले होते. मात्र जोरदार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापुर्वी खराब झाली आहे. कपाशीचे बोंड सडत असून, या नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबळ झाला आहे. शेतकरी एकदा कर्जात बुडाला की, तो पुन्हा या चक्रव्युवहातून बाहेर पडत नाही. केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे राजकीय द्वेष न ठेवता संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी मदत करणे गरजेचे असल्याचे निवेदन भारतीय जनता पक्ष व आरपीआय कडून देण्यात आले.

अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.पाथर्डी, शेवगाव तालुक्याच्या दौर्‍यावर हसन मुश्रीफ गेले असता भारतीय जनता पक्षाच्या पाथर्डीतील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा वाहनांचा ताफा अडवून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत देण्याची मागणी केली. शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनीही पंचनामे त्वरित करून मदतीची मागणी केली. नगर शहरात ही आरपीआयने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील भालगाव परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ चालले असता त्यांच्या वाहनाचा ताफा भाजपाच्या वतीने अडविण्यात आला. यावेळी पंचनामे न करता शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पाथर्डी - शेवगाव दौर्‍यावर आले होते. पालकमंत्री यांच्या वाहनाचा ताफा पाथर्डी शहरातून भालगावकडे जात असतांना पंचायत समितीसमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने अडविण्यात आला. यामध्ये गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, रवी वायकर, सदस्य सुभाष केकाण, सुनील ओहळ, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, राजेंद्र दगडखैर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल बुधवारी आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा नुकताच दौरा केला. यामध्ये असे निर्दशनास आले की, अतिवृष्टीने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे पंचनामे न करता शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करावी.निवेदन घेतल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या वाहनाच्या ताफ्यासह नियोजित दौर्‍यावर रवाना झाले. यावेळी त्यांच्या सोबत माजी आ. चंद्रशेखर घुले हे होते. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर अतिवृष्टीने शेतकर्यांची खराब झालेली पिके आणून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. विम्याचे पैसे भरुन देखील विमा कंपन्या अनेक त्रुटी काढून शेतकर्यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी सरकारने तातडीने तोडगा काढावा, शेतकरी या ओल्या दुष्काळाने उध्वस्त झाला असताना केंद्र व राज्य सरकारने शेतकर्यांसाठी भरीव मदत जाहीर करावी, केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर जबाबदारी टाकण्यापेक्षा शेतकर्यांना आधार द्यावा, ज्या शेतकर्यांची कर्ज माफी झाली नाही त्यांना अल्प व्याजदराने तातडीने कर्जपुरवठा उपलब्ध करुन द्यावा, पिकांचे पंचनामे करुन विमा कंपन्याकडून जास्तीत जास्त मदत शेतकर्यांना मिळवून देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, अशोक केदारे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, दया गजभिये, बापू सुर्यवंशी, मंगेश मोकळ, संतोष सारसर, सनी खरारे, प्रविण वाघमारे, राहुल लखन, तालेवर गोहेर, युवराज पाखरे, दिपक गायकवाड, विवेक भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, शफीक मोगल, नरेंद्र तांबोली आदि सहभागी झाले होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here