खडसेंमुळे खानदेशात राष्ट्रवादीला बळ मिळेल ः हसन मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

खडसेंमुळे खानदेशात राष्ट्रवादीला बळ मिळेल ः हसन मुश्रीफ

 खडसेंमुळे खानदेशात राष्ट्रवादीला बळ मिळेल ः हसन मुश्रीफ

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, त्यामुळे निष्काळजीपणा वाढणार नाही आणि प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा.रुग्ण संख्या घटल्यामुळे आता कोविड केअर सेंटरचा उपयोग पोस्ट कोविड केअर सेंटर म्हणून केला जाणार आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णांना काही त्रास जाणवत असेल तर त्यांना या सेंटरमध्ये उपचार केले जातील. यानंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सर्व जिल्हावासियांनी स्वताची आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ


अहमदनगर ः
एकनाथ खडसे राष्ट्रवादी मध्ये आल्यामुळे राष्ट्रवादीला खानदेशात मोठे बळ मिळेल. भाजपच्या जडणघडणीमध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. चाळीस वर्षापासून ते पक्षाचे काम करत होते.तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इतर माध्यमांद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, हे किती दुर्दैव आहे. खडसेंवर त्यांनी अन्याय केला, खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, खडसे यांच्या सारखा नेता एवढा कसा अन्याय सहन करू शकतो, याचं मला आश्चर्य वाटलं, राष्ट्रवादीने खडसे यांच्याबाबत पूर्वी काही विधाने केलेली होती. ती विधाने मागे घेण्यात आलेली आहेत. खडसेंचे कर्तृत्व दुर्लक्षित करून चालणार नाही. असं मत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल.
      अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी व कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नवे-जुने येणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष पातळीवर निर्णय घेतले जातील. पण जुन्यांना घ्यायचे की नाही, असे विचारल्यावर त्यांचे मेरीट तपासूनच त्यांना पक्षांमध्ये घेतले जाईल, असे ही मुश्रीफ म्हणाले.
         जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी आणि कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here