युवासेना पदाधिकारी व जिल्हाप्रमुखांत अखेर दिलजमाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

युवासेना पदाधिकारी व जिल्हाप्रमुखांत अखेर दिलजमाई

 युवासेना पदाधिकारी व जिल्हाप्रमुखांत अखेर दिलजमाई


अहमदनगर -
शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन युवा सेनेच्या एका पदाधिकार्‍याने पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना मारण्याची व वंजारी समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला होता तर जातीयवादी शाब्दिक चकमकीवरुन वंजारी समाज विरुध्द शिवसेना हा वाद उफाळला होता. समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्या सदर पदाधिकार्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी महासंघाने केली होती या वादावर आता दिलजमाई झाली आहे.शहर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी आज या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व वंजारी समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत युवा सेनाचे जिल्हाध्यक्ष रवी वाकळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहानगे त्यांच्यामध्ये दिलजमाई करून हा वाद संपुष्टात आणला.
   युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे यांनी याप्रसंगी शिवसेना हे एक कुटुंब असून हा वाद गैरसमजातून झाले असल्याचे सांगितले व वंजारी समाज व शिवसेनेत माझ्या शब्दांमुळे जो वाद झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी कधी कोणत्याही समाजाला दुखावण्याचा प्रयत्न करणार नाही .कारण शिवसेना हि आमची जात व धर्म व गोत्र असल्याचे म्हटले आहे.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा नेते विक्रम राठोड, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, अनिल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment