लिपिकास लाच घेताना अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 9, 2020

लिपिकास लाच घेताना अटक

                                                             लिपिकास लाच घेताना अटक
                                                                     अ‍ॅन्टीकरप्शन ट्रॅप!

 
नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सर्वसामान्य नागरिकांचे कुठलेही काम असो प्रशासनातील अधिकारी शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेऊनही नागरिकांना पैशाची मागणी करतात. पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम केले जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेतील कारकून सुनील फापाळे यांनी श्रीरामपूर येथील एका खंडकरी शेतकर्‍यांने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लातूर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून फापाळे यांना रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे.
खंडकरी शेतकर्‍याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेणार्‍या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (9 मार्च) सकाळी साडेअकरा वाजता रंगेहाथ अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय 48) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.फापाळे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहे. श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकर्‍याचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कूळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी फापाळे यांनी सदर शेतकर्‍याकडे लाच मागितली होती. याबाबत शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी लाचलुचपतर प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यांनी सापळा लावून लिपीक फापाळे यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यावेळी डीवायएसपी खेडकर, पो.नि. करांडे, हे.कॉ. तन्वीर शेख, पो.ना. जाधव, निमसे, पांढरे, चौधरी, हरून शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment